पान:महाबळेश्वर.djvu/196

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १६१ )


हजारों रूपये खर्च करूं लागले, व नानातऱ्हेच्या मजा मारीत फिरूं लागले तेव्हां कोठे आम्ही जागे झालों. परंतु अलीकडे आमचे लोकांस ही जागृति होऊन ऐतिहासिक स्थळे पाहण्याची इच्छा झाली आहे. ही अत्यंत अभिनंदनीय स्थिति होय अशा उत्सुक शोधकांस उपयोग व्हावा ह्मणून या पुस्तकांत येथील दर्शनीय वस्तूंची वेडींंवांकडी वर्णनें दिलीं आहेत, ती वाचून किंवा ऐकून त्या पाहण्याविषयी त्यांच्या अंतःकरणातील उत्सुकता अधिक तीव्र झाली पाहिजे.

 महाबळेश्वरीं दाट झाडी असल्यामुळे बसल्या ठिकाणींं फार वारा मिळत नाही, व हवेच्या थंडपणामुळे वारा घेण्याची इच्छाच होत नाहीं ही गोष्ट निराळी; पण एखादे वेळीं बंगल्यांतल्या बंगल्यांत किंवा घरांतल्या घरांत सोसाट्याची झुळूक पाहिजे, असें कोणी ह्मणेल तर ती त्याला सहसा प्राप्त व्हावयाची नाहीं. याचे कारण उघडच आहे. झाडें हे पंखे खरे पण हे सजीव पंखे हालूंं लागून त्यांपासून वारा सुटण्यास हीं झाडे फार विरळ असलीं पाहिजेत. येथें तर ती