हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १६० )
घोडयावरून अगर गाडींतून फिरावयास
जाण्याचीं ठिकाणें व पादचारी
लोकांना रपेटीस किंवा
व्यायाम करण्याचीं
ठिकाणें.
भव्य अशा सृष्ट किंवा कृत्रिम वस्तु पाहण्याची हौस सर्व लोकांस असते. अशा वस्तु आमच्या देशांत कांहीं थोडया थोडक्या नाहींत, परंतु अति परिचयामुळे संनिध असलेल्या प्रेक्षणीय व वर्णनीय वस्तूंची आपल्या हातून अनेक वेळां अवज्ञा होते, आणि त्यामुळे त्या वस्तूंच्या दर्शनापासून होणाऱ्या ज्ञानास व आनंदास आपण अंतरतों. त्याचप्रमाणें येथील उंच उंच भयंकर कडे, मोठमोठे धबधबे, अनेक शैलसमुदाय, घनदाट झाडी, रायगड, प्रतापगड, यां सारखे किल्ले, यांची आजपर्यंत स्थिति झाली आहे. कारण, त्यांजकडे कोणींच लक्ष देऊन त्यांच्या प्रेक्षणीय स्थितीचें कधीही वर्णन करून ते लोकांत प्रसिद्धीस आणले नाहीत. अखेरीस परके लोक येथें येऊन येथील वस्तूंच्या आल्हादजनक दर्शनानें तल्लीन होऊन जाऊन जेंव्हांं