पान:महाबळेश्वर.djvu/193

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १५८ )

 चिंता उत्पन्न करणारी कामें ते बिलकुल करीत नाहींत. परंतु केवळ शरीराची समृद्धी व चित्ताची प्रसन्नता ते ठेवीत असतात.

 इंग्रज लोकांत विवाह होतात ते स्वयंवरविधीने होत असतात. ते होण्यात प्रथमतः उपवर वधुवरांचा विद्या, नीति, कला, वगैरेंचा तपास होऊन एकमेकांची परीक्षा करण्याची त्यांच्यामध्यें आवश्यकता असते. तशी परीक्षा होण्यास एकमेकांची भेट होणें इष्ट आहे. तेव्हां हा भेटीचा योग येथें फिरतेवेळी, खेळांमध्यें, नृत्यगायनाचे समयीं, भोजने व वनविहार यांच्या निमित्तानें, अनायासें घडून येतो. तेणेंकरून परस्पर संघट्टण व मैत्री होऊन वाक््निश्चय होऊन जातात; व महाबळेश्वराहून खालीं गेलें, ह्मणजे लग्नांची एकदम गर्दींं उडते. याकरितां शुद्ध, निर्मळ, व निष्कपटी प्रेमाच्या वृद्धीस महाबळेश्वरचें हें स्थळ सर्वांशीं उपयोगी आहे.

 आपल्या राजेरजवाडयांपैकीं जे दोन चार गृहस्थ येथे येतात, त्यांना व मोठमोठया व्यापाऱ्यांस जास्त कमी पैसा खर्च करण्याचें सामर्थ्य असल्यानें महाबळेश्वरचें सुख बरें मिळतें. तरी त्यांचा बहुतेक सर्व ऐषा-