पान:महाबळेश्वर.djvu/192

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १५७ )

 दीड पुरूष उंचीचे खांब रोंविलेले असतात. व त्यांच्या वरच्या भागाला, अडीच तीन हात रुंदीचा जाळीदार तारांचा एक पत्रा बांधितात, आणि दोन्ही बाजूनें खेळणारे लोक उभे राहून या पत्र्यावरून या बाजूकडून त्या बाजूकडे पिसांचीं फुलें टाकीत असतात. या खेळाचे वेड इंग्रज लोकांस व विशेषेकरून त्यांच्या स्त्रियांस इतकें असतें कीं, महाबळेश्वरीं दुसरा कांहीं नियमित उद्योग नसल्यामुळे प्रत्येक दिवशीं निमेअधिक काळ बाडमिंटन खेळण्यांत गुजरतो. राजविलासी मेजवान्या कधीं गव्हरनर साहेबांकडे, कधीं सेनाधिपतीकडे, कधीं इतर श्रीमंत लोकांकडे होतच असतात. अशा प्रसंगीं गायन सदोदित चालत असतें, याखेरीज आठ दहा दिवसांनीं फ्रिअर हालमध्यें नाटयनाटकें होत असतात. कधी कधी वेण्या सरोवरावर जलक्रिडेकरितां पुष्कळ लोक जातात व इतर रमणीय ठिकाणीं वनभोजनें वारंवार होत असतात. धर्मादायाची सत्कृत्येंही येथें होत असतात. सारांश- या ठिकाणींं ऐहिक अर्थास अनुलक्षून तनु, मन, धन, खर्च करून इंग्रज लोक शारीर सुखाच्या पाठीमागें लागलेले असतात. व्यग्रता किंवा