पान:महाबळेश्वर.djvu/188

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १५३ )

 रहात असतात. याही पुरत नसल्यामुळे फ्रिअरहाल आणि पोष्ट आफेिस यांच्या दरम्यानच्या उच्चस्थानीं आणखी सहा खोल्या बांधिल्या आहेत.

 ह्या सहा खोल्यांचे मागील बाजूस चार लॉन््टेनिस कोर्टेंं व बुडहौस नजिक बॅॅडमिंटनकोर्ट अशींं केलेलीं आहेत, तीं क्लबच्याच मंडळींकरितां आहेत. फ्रिअर हालच्या मागील दरवाज्यापासून जी उतरण आहे तिचे तळांतील सपाटीच्या ठिकाणीं जिमखान्याचे मैदान आहे. यांत बायकांचा गोळीबार, गोल्फ, पोलो, शर्यती, घोडयाची दौड व इतर खेळ चालतात.

 महाबळेश्वरास एक दोन मोठीं हाटेलें आहेत; मोठे पुस्तकालय व पत्रकालय आहे; उघडया हवेंत खेळण्याचीं कोर्टेंं आहेत. टांग्यांत बसून हिंडण्यासारखे, घोडयावर स्वार होऊन दौड करण्यासारखे, किंवा सकाळ संध्याकाळ हवा तितका व्यायाम करण्यासारखे लहान मोठे, निर्भय, व एकांत असे रस्ते आहेत; प्रार्थना करावयाची झाल्यास ख्रिस्ती देऊळ आहे; एक कबरस्तान आहे; जिमखाना आहे; नाटकगृह आहे; शर्यतीचे राउंड आहे; होडया फिरविण्यासारखे तळे