पान:महाबळेश्वर.djvu/189

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १५४ )

 आहे; गव्हर्मेंट हौस ह्मणजे सरकारी बंगला आहे. लॉंनटेनिसकरितां कांहीं जागा कमी पडत होती ती लार्ड हारिस यांनीं सरकारी बंगल्याच्या हद्दींतील कांहीं झाडी तोडवून लागलींच तयार करून दिली. तसेंच बंगल्याच्या जवळ पोलोची जागा पाहिजे असें वाटल्या बरोबर झाडी तोडवून जागा तयार करून दिली गेली.

 येथें येणारे आमचे जहागिरदार, राजेरजवाडे व बडे लोक यांनाही चैन करण्यास कांहीं कमी साधने आहेत असें नाहीं. हे ज्या बंगल्यांतून राहिलेले असतात ते बहुतेक त्यांच्या मालकीचेच असल्यामुळे त्यांचे कंपौन्डांत सर्व सोयी करून घेऊन ते आपल्या इष्ट मित्रांबरोबर वाटेल तशी मौज करीत असतात; यामुळे यांचाही वेळ निष्काळजीपणांत व आनंदांत गेल्यानें यांच्या प्रकृतीसही फायदा होतो. परंतु साहेब लोकांप्रमाणें समाज करून खेळण्याच्या यांच्या येथे कोठेही जागा नाहीत; तथापि एकमेकांच्या बंगल्यावर जाऊन मेजवान्या घेणें, मनोल्हादक गाणे ऐकणें वगैरे मजा मारण्यानें येथें जमलेल्या मंडळीचे प्रेम जास्त वाढून चांगले स्नेह जमत असतात.