पान:महाबळेश्वर.djvu/187

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १५२ )

 दिवसाचे महिन्यास अगाऊ वर्गणी ३ रुपये देणारास कुटुंबसह लायब्ररीचा उपयोग करण्याची हरकत करूं नये. कुटुंबाची मंडळी तिहींहून जास्त असल्यास प्रत्येक जास्त मनुष्यास दरमहा १ रुपया जास्त दिला पाहिजे. महाबळेश्वर क्लबच्या वर्गणीदारांना लायब्ररीची वर्गणी निराळी द्यावी लागत नाहीं.

 फ्रिअर हालला लागूनच १८८२ सालीं महाबळेश्वर क्लबाची इमारत बांधण्यांत आली. या इमारतींत आराम घेण्याचा हाल, जेवणाचा हाल आणि बिलियर्ड खेळ याचा हाल इतकीं निरनिराळीं दालनें आहेत. क्लबाचे मेंबर निवडतांना गुप्त रीतीनें किंवा उघडपणें मतें घेऊन ज्यास बहुमत पडेल त्यास मेंबर निवडतात. कायमचा मेंबर होण्यास प्रवेश फी ७५ रु; सीजन पुरता मेंबर होण्यास प्रवेश फी २५ रू० आणि १० दिवस मेंबर होण्यास प्रवेश फी १० रुपये द्यावी लागते. शिवाय दरमहा वर्गणी रीतीप्रमाणें १० रुपये ही दिलीच पाहिजे. जवळ सानिटेरियमची जुनी सरकारी इमारत आहे तीही क्लबाला उपयोग करण्यास मिळाली आहे. या इमारतीत दुजोडी आठ खोल्या आहेत, त्यांत मेंबर लोक