पान:महाबळेश्वर.djvu/186

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १५१ )

 कांची दरेस साफ करण्याची खोली वगैरे आहे. मध्य भागाच्या दालनांत इंग्लंडांतील व हिंदुस्थानांतील मुख्य मुख्य वर्तमानपत्र, मासिक पुस्तकें, त्रैमासिकें व सचित्र वर्तमानपत्रे ठेवलेली असतात. तीं वांचीत बसण्याकरितां उत्तम रेशमी गादीच्या खुर्च्या व मेजें मांडलेली आहेत. या दालनाच्या मागील अंगास व्हरांडयांत पुष्कळ आरामखुर्च्या मांडल्या आहेत. त्यांवर बसून पुष्कळ लोक कोणी हवा घेत, कोणी गप्पा मारीत, कोणी उजव्या बाजूचा झाडी व धुके यांचा देखावा पहात व कोणी वर्तमानपत्रं वांचीत पडलेले असतात. याच दालनाला फ्रिअर हाल अशी संज्ञा आहे. कधीं कधीं रात्रीचे वेळीं यांत नाच, नाटके, वगैरेही होतात.

 या फ्रिअर हालमध्यें सात साडेसात वाजेपर्यंत येण्यास सर्व वर्गणीदारांस मुभा आहे. आणि पुढे मात्र फक्त क्लबाची मेंबर मंडळी बसतात. सरकारच्या हुकुमानें फ्रिअर हाल कमीटीच्या तांब्यांत दिला आहे. परंतु या कमीटीस सरकारचा असा हुकूम आहे कीं, दरमहा अगाऊ वर्गणी ५ रुपये किंवा १५ दिवसापेक्षां कमी