माणिकजी लिमजी यांनी उचल केली होती. अशी गोष्ट झाली कीं, १८६४ मध्यें हे गृहस्थ येथें होते त्या वेळीं त्यांस सार्वजनिक सभा भरविण्यास येथें जागा नाहीं असें दिसून आल्यावरून ते ही इमारत बांधण्याच्या नादास लागले. पहिल्यानें एक वर्गणीची यादी करून त्यांत त्यांनी स्वतः २०००हजार रुपयांचा आंकडा घातला, आणि नंतर पुष्कळ श्रीमान् पारशी लोक, माथ्युसाहेब, श्रीमंत फलटणकर साहेब, आणि दुसरे बडे हिंदु लोक यांनीही त्या फंडास उदार आश्रय दिला. पुढे काम सुरूं झाले. परंतु पैशाची तूट पडल्यामुळे वर्षानें येथील सुपरींटेंडंट साहेबांनीं वर्गणीने पैसे काढण्याची खटपट केली तेिचा कांहीं उपयोग झाला नाहीं. तेव्हां त्यानीं सरकाराचे कानावरही ती गोष्ट घातली. आणि मग सरकारानें हें काम पुरें करण्याचें यश घेतलं.
या इमारतींत मोठमोठीं तीन दालनें आहेत. पश्चिम बाजूस दालन आहे, त्यांत निवडक निवडक वाचनीय इंग्रजी पुस्तकें कपाटांतून भरून ठेविलीं आहेत. याच भागाला लागून साहेब व मडम लो-