Jump to content

पान:महाबळेश्वर.djvu/184

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १४९ )

  येथपर्यंत “ महाबळेश्वर " हें ठिकाण सर्व मुंबई इलाख्यांत पहिले प्रतीचे सॅॅनिटेरियम (आरोग्यवर्धनीय स्थान ) ठरविण्यास येथें कोणत्या नैसर्गिक गोष्टींची कशा प्रकारची अनुकूलता किंवा स्थिति आहे, हें दिलें आहे. आतां याचे पुढील भागांत मनुष्ये आपल्या सोईस किंवा संवईस अनुसरून कोणत्या कृत्रिम व्यवस्था करून घेऊन या सृष्ट पदार्थाचा कोणत्या प्रकारें फायदा करून घेत आहेत, हें थोडक्यांत पण सुरस रीतीनें सांगितलें आहे.

----------------
साहेब लोकांची व्यवस्था.
----------------

 ख्रिस्ती देवळाच्या उत्तरेस खुल्या जागेवर फ्रिअर हालची इमारत आहे. ही इमारत गॉथिक घाटाची (ह्मणजे कमानी कमानीची ) अशी बांधलेली आहे. इला सर्व तांबडा दगड घडून बांधकामास लावला आहे. ही बांधण्यास पहिल्यानें मुंबईचे शेट कावसजी