पान:महाबळेश्वर.djvu/183

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १४८ )

 कामांत सरकारानें हात आखडता घेतल्यामुळे सर्पसत्र अर्धवटच राहिलें, त्यायोगानें हल्लीं फार भिऊन रहावे लागते.

 जन्मेजयाच्या सर्पसत्रानें त्या जातीला चांगलाच नरमपणा आणून सोडला आहे तसा आधुनिक खटपटीचा परिणाम झाला नाहीं. पूर्वीच्या सर्पसत्राचा वचक बसून गेला आहे त्याचें अद्याप पावेतो प्रत्यंतर येतें, तें असें: रात्रीं बेरात्रीं घराच्या आसपास किंवा घरांतील अडचणीचे भागांत यांचा कोणी जातवाला येऊन ओरडूं लागला ह्मणजे पुढील श्लोक त्याला ऐकू येई इतक्या मोठ्यानें ह्मणूं लागलें असतां त्याला पूर्वीची स्मृति होऊन तो निघून जातो किंवा त्याचें कच कच ओरडणें बंद होतें. याचा आवाज उंंदरासारखाच आहे परंतु थोडा कर्कश आहे. तो श्लोक असा:-

  आस्तीकवचनं श्रुत्वा यः सर्पो

  न निवर्तति। शतधा भिद्यते

  मूघ्नि शं शं तस्य फलं यथा ॥


---------------