कारण दिवसासुद्धां हीं फुरशीं रस्त्यावर येऊन माती खात स्वस्थ पडतात. या फुरश्यांचे दंशावर पाचगणीस जान चेस साहेब म्हणून कोणी असे तो दंश होतांच इलाज करून मनुष्य सहसा दगावू देत नसे. त्याची अशी पद्धत असे कीं, डंसलेल्या ठिकाणाच्या वरच्या बाजूस घट्ट बांधून तो डंसल्या जागीं चिरण्याचे शस्त्रानें फासण्या मारी आणि असें करून त्या जखमेतून यथास्थित रक्त वाहून गेल्यावर त्या ठिकाणीं तो कास्टिक लावीत असे. हा प्रयोग चालतांना दर १५ मिनिटांनीं तो अमोनियाचा अमल देऊन गुंगी आणी. अखेरीस त्या मनुष्याला झोंप येई ती तो घेऊं देत नसे.
हे विषारी जीव नाहीसे व्हावे म्हणून हे मारणारे लोकांना बक्षिसाची लालूच दाखवून परिक्षिति राजाचा मुलगा जन्मेजयाच्यासारखेंं सर्पसत्र करण्याचा आव सरकारानें फंंड जमवून घातला होता. त्याचा दर अस्सल नागांस प्रत्येकीं दोन आणे व इतर प्रकारच्यांस एक आणा याप्रमाणें होता. त्याप्रमाणें संहारोपक्रम येथील धावड जातीच्या लोकांनीं विलक्षण प्रकारचा चालविला होता. परंतु पुढेंं ह्या बक्षिसाच्या