जिकडे तिकडे दाट अरण्यांत सर्वत्र दिसतात. हे सरासरी दोन इंच लांब असून बारीक वातीप्रमाणेंं सूक्ष्म असतात. हे मनुष्य किंवा जनावरें जाण्यायेण्याच्या वाटेवर आपली मान वर करून बसलेले असतात, आणि वाटेनें जाणाऱ्याच्या पायाला डंसतात. हा जीव जळूप्रमाणें रक्त शोषून घेऊन मग आपोआप खालीं पडतो व नंतर डंसल्या जागेतून थोडा रक्तश्राव होऊन थांबतो. यामुळे मनुष्य अजिबात जायबंदी होण्याची भीति नसते.
बाकीचीं सर्व जनावरें फारच भयंकर आहेत त्यांच्या तडाक्यांत आल्यावर, तीं यमसदनास नेल्यावांचून सोडणारीं नाहींत.
हे सर्व विषारी प्राणी पावसाच्या दिवसांत दगडांखालीं मोठमोठींं बिळे असतात त्यांत निवाऱ्याच्या ठिकाणीं जाऊन बसतात. पुढें पावसाळा खलास होऊन उन्हाची ताप पडू लागली, ह्मणजे बाहेर निघून जंगलांतील लहान झाडांवर किंवा खडकावर हे ऊन खात खुशाल पडतात, तेव्हां इकडील लोकांस ते संवयीनें चट्कन् दृष्टी पडतात. नवीन परकीय मनुष्याला यांची