पान:महाबळेश्वर.djvu/179

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १४४ )

 जालीम असतें की, ज्याच्यावर हिचा अनुग्रह होईल तो जगण्याची कोणी आशाच करावयास नको.

 फुरसें-हें जीवाणूंं वीत-दीडवीत, पराकाष्ठा हात भर लांब असून मधल्या बोटाइतके जाड असतेंं. याचा रंग कांहीं काळ हिरवा व पिवळा अशा मिश्रणाचा असतो.हे मोठे असल्यास याचे अंगावर केंसही असतात. याचें विष जलाल असल्यानें हें डंसलें असतां मनुष्य जगत नाहीं. याचे विष उतरून मनुष्य बरा होण्यासाठीं इकडील लोक ज्या ठिकाणीं याचा दंश झाला असेल त्या ठिकाणी कोंबडयाचें गुदस्थान लावितात, असे केल्यानें कोंबडें विष शोषून घेऊन लागलीच मरतें. याप्रमाणें बारा पंधरा कोंबडी मेल्यानंतर पुढें कोंबडी मरेनाशी झाल्यावर तो मनुष्य दगावत नहीं. हा उपाय तें डंसतांच केला तर गुण येतो, नाहीं तर ते करण्यांत मुळींच अर्थ नसतो.

 विंचु-हा विषारी प्राणी आहे, परंतु याचें विष घातुक होत नाहीं. विंचवांत इंगळी ह्मणोन जी जात असते, ती डंसली तर मात्र फार प्राणांतिक वेदना होतात.

 कांट किंवा कानिट-हे जीव पावसाळाभर