पान:महाबळेश्वर.djvu/178

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १४३ )

  नाग- या जातीचा सर्प फार चलाख असतो. हा पिंवळा धमक असून अस्सल जातीचा असला म्हणजे याची खोडी केल्यावांचून हा सहसा कोणाच्या वाटेस जात नाहीं. परंतु मुद्दाम किंवा आकस्मिक त्यास कांहीं धक्का लागला, तर तो मग कोणाची भीड न ठेवितां एकदम चाल करून अंगावर जातो. अशावेळीं त्याचा निरुपाय झाल्यास, तो आपल्या जिवाचा बचाव करण्यास वाट सांपडेल तेथें जाऊन दडी देतो, आणि पुनः आपला वाद्या सांपडेल तेव्हां त्याच्या शब्दज्ञानानें त्याला ओळखून त्याचा सूड घेतो !

 धामण-ही काळसर रंगाची असून हिचें तोंड व शेंपूट सारखेच जाड असतें. हिचा असा चमत्कार आहे की म्हशीची व हिची नजरानजर झाल्यास ह्मैस नम्र होऊन तिच्यापुढें शेवटचें लोटांगण घालते, आणि ती पुनः कधीही उठत नाही. ही मनुष्यास चावली असतां वेळेवर औषध पोहोचल्यास मनुष्य मरत नाहीं.

 मण्यार-या जनावराच्या अंगावर पांढरे ठिपके असून ही जात्या फार चलाख असते. हिचें विष इतकें