पान:महाबळेश्वर.djvu/177

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १४२ )

 तळखोऱ्यांत बुलबुलपक्षी उर्फ भुलगड, सुतारपक्षी, गिधाड, रानकोंबडा, मोर, साळुंंखी, हुलगुड, घारी, ल्हावा, पाकोळी, पिंगळा, डोळा, झाप, काळोटी, चिचारी, गोगी, पारवा, पोट्यारा, वाघूळ, गोचर, गोमा, केकाटी, खंड्या, कुकुडकुंबा, बगळा, परटीण, मालगाजी, बहिरीससाणा व इतर जंगली पांखरेंं रानांत दृष्टीस पडतात. म्हणून येथे डोंगरावर जर जोंधळा बाजरीचेंं पिक कोणी केलेंं असतेंं तर त्याला माळा घालून पांखरेंं राखण्यास जावयाचेंं कारण पडले नसतेंं!

सर्प.

 महाबळेश्वरची थंड हवा उष्ण प्रकृतीला फार मानवते म्हणूनच येथे कोकणाप्रमाणेंं बहुतेक विषारी जिवाणूंचा भरणा झाला आहे की काय, हे निश्चितपणेंं सांगतां येत नाहींं. नाग, अधेल्या साप, धामणी, मण्यारी, फुरसें, राती, चापडा, महांडोळ किंवा अजगर, जोगेटा, रुखाडा, येरंड्या, फरड, चितई, कांडोर, विंचू, इंगळी, विसांबर ( पालीप्रमाणेंं ) वगैरे जातींची जिवाणेंं येथेंं आहेत त्याबद्दल थोडाफार विचार करूं.