Jump to content

पान:महाबळेश्वर.djvu/175

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १४० )

 करावी लागते. म्हणजे कोठे २|३ दिवसांनीं त्याला एखादे सावज मिळालें तर मिळतें. हीं जनावरें ह्या आमिषाचा एकदम स्वाहा करीत नाहीत, यामुळे एकदां येऊन यांनीं याचा मासला पाहिला असें समजतांच आसपास लपून बसून हीं पुनः त्यांस खाण्यास येतांच त्यांचा शिकारीलोक मोक्ष करतात.

 आर्थरसीटच्या आसपास हिंवाळ्यांत व उन्हाळ्यांत सांबर सांपडतात. येथें कारवी वगैरेची झुडपांची खुरटी झाडी दाट असल्यामुळे त्यांना हुसकून माऱ्यांंत आणण्यास फार त्रास पडतो. येथें ससे भेंकरें वगैरे इतर जनावरेंही पुष्कळ आहेत; ती विशेषेंंकरून वाहत्या पाण्याचे नजिकच्या झुडपाळ रानांत असतात. हीं जनावरे फार जागरूक व सावध असतात. या डोंगरावरील रानडुकरें व सायाळ फक्त रात्रीस येऊन बटाटे लावलेल्या शेताची धूळधाणी करतात. मार्च व एप्रिल महिन्यांत पांचगणीरस्ता लिंगमळा व वेण्यावॉटरफाल् यांचे आसपास लावी पक्षी असतात त्यांची शिकार करण्यात लोक फार जातात.