पान:महाबळेश्वर.djvu/174

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १३९ )

 दग्नी काय दंड करतील हेंही सांगतां येत नाहीं. तेव्हां अशा गृहस्थाचें दर्शनसुद्धां नको असेल तर सूर्योदयापूर्वी व सूर्यास्तानंतर यांचे वस्तीच्या जवळ जाण्याचे धाडस करूं नये हेंच चांगले.

 रात्रीचा सापळा लावून ठेविला, म्हणजे घुशीप्रमाणें वाघ पिंजऱ्यांंत आडकून सांपडतो. असे जिवंत वाघ धरण्याचे येथील कांहीं बंगल्यावर सांपळेही आहेत. गेले आक्टोबर सन १९०१ इसवी महिन्यांत असा जिवंत सांपडलेला वाघ भावनगरचे महाराजांनीं आपले मुलखांत पाठवून दिला आहे. असे भटक्या मारीत फिरणारे वाघ किंवा इतर श्वापदे येथें रात्रीस कधीं कधीं अगदीं गांवाजवळ येतात.

 येथें इतकीं जनावरें आहेत तथापि मोठी शिकार सांपडेल असा शिकारी लोकांना भरंसा नसतो. सुमारें १० वर्षीपूर्वी येथें बरेच वाघ मारण्यांत आले होते. यामुळे पूर्वीपेक्षां आतां यांची जात कमी झाल्याकारणाने शिकारी लोकांना शिकारीकरितां एल्फिन्स्टन पाइंटाकडे मडिमहालांत किंवा पारूत म्हणून दाट झाडीचे ठिकाणींं रेडा किंवा बकरें बांधून ठेवून उमेदवारी