तात. फारच भूक लागली म्हणजे कांहीं भक्ष्य मिळविण्याकरितां हीं माणसाच्या वस्तीजवळ येतात. त्या वेळीं ग्राम्य जनावरांना वाघाचा वगैरे लांबून वास येऊन त्यांची अगदीं गाळण होऊन जाते. वाघ वगैरे हिंसक जनावरांना लांबून माणसाची चाहूल लागली, म्हणजे तींही भिऊन जवळ येत नाहींत. याकरितां येथील कोंकणे व धावड वगैरे जंगलांत जाण्यायेण्याचा प्रसंग पडणारे लोकांजवळ मोठमोठया काठया असून त्यांवर लोखंडी लहान लहान तुकडे कोयंड्यांत बसविलेलें असतात. या काठया नुसत्या हालविल्या तरी त्यांपासून आवाज होतो. तसा आवाज करीत वाटेनें चाललें, किंवा मोठयानें बोलत चाललें म्हणजे ह्या जनावरांची जवळ येण्याची भीती राहत नाही.
परंतु एकटें दुकटें अगदीं सकाळी किंवा सायंकाळी जर झाडीतून मुकाटयानें चाललें, तर वाघोबांची मुलाखत होण्याची फार भिति असते ! या स्वारींचा सामना झाल्यास असलेल्या जागेवरून हलता येत नाहीं, व त्यांचा अपमान करून कोणी आपली मार्ग सुधारला, तर त्याबद्दल त्याला हे शीघ्रकोपी जम-