हे पान प्रमाणित केलेले आहे.
जनावरें.
---------------
मोठया हिंसक श्वापदांपैकी पट्टे असलेले डाहाणे वाघ, बिबेवाघ, चित्तेवाघ किंवा दिवटी, आणि लहान जनावरांपैकींं तरस, खोकड, सांबर, डुकर, भेकर, सायाळ, ससे, खार, मुंगुस, कोल्हा, भालु, पिशारा, कोळिसरा, रानमांजर, भाट, यांचे येथील जंगलांत अगदी माहेरघर आहे. इतक्या सर्व प्रकारची जनावरें एके ठिकाणी राहण्यास, देशावर असे ठिकाण बहुतकरून नाहींंच. या जनावरांना येथे राहण्यास, हवा थंड, झाडी गर्द असून मनसोक्त, शिकारी किंवा पारधी लोकांचा मुळींच सुळसुळाट नाही; अशी स्थिति असल्यामुळे येथेंं त्यांस येथेच्छ क्रीडा करण्यास सांपडतेंं. ही जनावरे असतात, त्या ठिकाणी सूर्यदर्शनसुद्धा होणेंं कठीण इतकी झाडी असल्यामुळे रात्र व दिवस हींं यांना सारखीच वाटतात. म्हणून दिवसास सुद्धांं वाटेल तेव्हां वाटेल तिकडे भडक्या मारीत हींं फिरत अस-