हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १३६ )
रिना, युक्यालिया वगैरे झाडांचीं रोपें तयार करण्याची नर्सरी आहे, त्यांत तीं तयार करून बंदीच्या फॉरेस्टांत लावण्याची जारीनें मेहनत चाललेली आहे. यांपैकीं विलायती झाडें पांचगणीच्या सुरूच्या झाडासारखी असल्यामुळे, तीं मोठी झाल्यावर एकंदर झाडीला फार शोभाप्रद होतील यांत संशय नाही. आंबा, फणस हीं झाडें उत्पन्नाचीं असून छायाही भरपूर पाडणारीं आहेत.
कोयनेलचीं झाडे
१८६५ पासून १८७५ पावेतों निलगिरीप्रमाणें येथें कोयनेलचीं झाडे तयार करण्याचा कारखाना चालला होता. त्यास सरकारचे ६४,००० रू० खर्च झाले॰ परंतु यश आलें नाही, यामुळे सरकारास तो नाद अजिबाद सोडून द्यावा लागला. येथून जवळच लिंगमळा बाग आहे त्यांत सरकारांनीं वेण्येच्या पाण्यावर हा कारखाना काढून चालविला होता त्यावेळीं तेथें बांधलेला बंगला हल्लींं त्यांनीं जंगलखात्याकडे दिला आहे.
---------------