पान:महाबळेश्वर.djvu/170

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १३५ )


 या शिवाय झाडांच्या सावटीनेंं येणारे गवत गुरास चारल्यास शेतकरी लोकांस दरसाल गुरामागेंं २ फी, व इतर लोकांस दरसाल म्हशीस १ रु० व गाईस ८ फी, कुळकर्ण्यांकडे भरून त्याचा दाखला जवळ बाळगावा लागतो. अशी सरकारची कदर बारीक मोठया जिनसावर सारखीच आहे. ती अशा किरकोळ गोष्टीत थोडी ढिली असल्यानेंं, म्हणण्यासारखा तोटा न होतां गरीब रयतेवर मोठे उपकार होतील.

 तसेंंच या पांच मैलांतील काही गांवांवर कोंडवाडा फी शेतकऱ्यास वाजवी फीचे द्विगुणित आहे. जंगलांतील मोठेंं वठलेलेंं झाड हातानेंं किंवा कुऱ्हाडीनेंं तोडून आणण्याची सरकारची सक्त मनाई आहे. फक्त आपोआप गळून पडलेलींं किंवा हातानेंं मोडून निघणारी जळाऊं लांकडेंं गरीब लोकांना फुकट गोळा करून आणण्याची व तींं विकण्याची सरकारानेंं त्यांस सवलत दिली आहे. यामुळे लांंकूड आणणारे पोटार्थी धावड वगैरे लोकांस लांकूड मिळविण्यास फार पंचाईत पडते.

  येथून सुमारे सहा मैलावर गुरेघर ह्मणून गांव आहे तेथे आंबा, फणस, ग्रेव्हिलिया, रोपस्टा, क्याश-