पान:महाबळेश्वर.djvu/169

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १३४ )


खचित आहे. या मावळांतील गाई, म्हशी वगैरे दुभत्या गुरांना गवत किंवा त्या जातीचेंं भात, नाचणीचेंं काड वगैरे खाल्लयावांचून गत्यंतरच नसतेंं. कारण, कडबा, सरकी वगैरे जिवट पदार्थ येथेंं दुर्लभ आहेत. यामुळेंं देशावरील जनावरेंं मावळांत आणून बाळगलींं तर या खाण्यानेंं फार दिवस जगत नाहींंत. परंतु इकडील कोंकणी गुरांना त्याचेंं काहींं वाटत नाही. तथापि हींं कोकणींं जनावरेंं गवतावर अवलंबून असल्यामुळेंं वाटेनेंं चालतांना पाहिलींं तर मलूल झालेलींं दिसतात, आणि देशावरच्या गुरांप्रमाणे सतेज व खोडकर अशींं नसतात. तसेच यांच्या दुधातुपांतही सत्वस्थपणा फार कमी असतो.

 १००० हिरड्याचेंं उत्पन्न सुमारेंं.

 १२०० शिककाईचेंं उत्पन्न ( अजमासेंं )

  १५० गवताचेंं उत्पन्न ( अजमासें )

 ८०० (सपाटीवरील ) जळाऊ लांकडेंं सर-

  कारी तोड होऊन विक्रीचेंं.

 १६० चिवे (लोकांनी फी देऊन नेणेंंबद्दल )

 ५० दगड (गाडीभर नेल्यास एक आणा

  फीप्रमाणेंं )

 -------