पान:महाबळेश्वर.djvu/167

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १३२ )


जंगल खाते.

 या महाबळेश्वरच्या शिखरावर जंगल राखल्यामुळेंं जंगलखात्यास बरेंंच उत्पन्न होऊन हवा फार सुखकारक झाली आहे, असेंं जरी आहे, तरी त्याचेंं वाईट परिणाम शेतकरी व दुसरे गरीब वर्गातील लोक यांस भोगावे लागत आहेत, हेंं उघडपणे दिसून येईल.

 जंगलाचेंं उत्पन्न हिरडा, शिककाई, गवत, जळाऊं लांकडेंं, चिंवे व दगड वगैरे पासून सुमारे ६००० रू० येते, व खर्चाची रकम सुमारेंं ३००० लागते. ही वजा जातां सरकारच्या पदरांत सुमारे ३००० रु० निवळ फायदा पडतो. हे उत्पन्न दिवसेंदिवस वाढत जाऊन आज इतक्या स्थितीवर आलेंं आहे.

 हिमालयांत औषधी वनस्पति जशा विपुल आहेत तशाच या महाबळेश्वरच्या थंड हवेंंतही कांंही कमी नाहींंत. यामुळे जंगलांतील सर्व झाडांचे नामकरण दुबार होऊंं नये म्हणून वनस्पतीवर्गात दिले आहे; तिकडे पहावेंं. चिंव्यांच्या जातीही " झाडी" या सदराखालींं देऊन कोणात्या काय कामास येतात हेंंही सविस्तर सांगितलेंं आहे.