हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १३१ )
पासून इजा होण्याचेंं भय नसतेंं खरेंं; पण तरीसुद्धा कपड्यानेंं सर्व अंग गच्च झांकून टाकावे लागतेंं. ह्मणजे अंधारांत चुकूनही त्या खवळलेल्या माशा डंसण्याचे मुळीच भय राहत नाही. दिवसास त्या पोवळ्याजवळ जाण्याचा कोणाचा हिय्या होत नाही. येथील पुष्कळ कोळी लोक हेंं जिवावरचे काम करून उदरनिर्वाह करीत आहेत,
येथेंं दरसाल १,००० पासून १,५०० रुपये किंमतीपर्यंतचा मध बाजारांत विक्रीस येतो. मग हा मध बाजारांत आणल्यावर दुकानदार लोक तो कांचेच्या बाटल्यांत भरून विक्रीस ठेवितात. असा बाटलीत ठेविलेला मध ताज्या मधापेक्षां फार चांगला असतो. कारण, बाटलीतील मधावर काही दिवसांनी बाटलीचे तोंडाशींं दुधाच्या साईप्रमाणे पांढरा पदार्थ जमतो, त्यास पिठा असें ह्मणतात. तो काढून टाकून मग त्याच्या खालील मध घेण्यास योग्य होतो. हा पिठाही कांंही विशेष कामास उपयोगी पडतो.
----------------