पान:महाबळेश्वर.djvu/165

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १३० )

 श्वराने एकाला एक शत्रु करून ठेविले आहेत. तसे नसतें, तर कोणी कोणाचे भय न बाळगता व मर्यादा न राखिता सर्वत्र अनर्थच झाला असता. सर्वांत मनुष्याचे ज्ञान व कल्पना ही फारच श्रेष्ठ आहेत. त्याचे योगानें हा काय पाहिजे ते करू शकतो. आणि म्हणूनच ह्या माशांच्या पोळ्यांवर हल्ला करून त्यानें या माशांचा कडेकोट बंदोबस्त तुच्छ करून टाकला आहे, आणि त्यापासून आपला उपयोग करून घेतला आहे. हे पोळेंं काढण्याचे धाडसी काम करण्यासाठी येथील कोळी लोक कड्यावरून दोरांची शिडी करून खालींं सोडतात आणि त्यावरून खालींं जेथे पोळींं असेल तेथपर्यंत येतात. नंतर आडवे झोंंके घेत घेत गवताच्या लांब केलेल्या पेंडीने किंवा चुडीने पोळीला आग लावितात व त्याचे योगानेंं त्यावरील माशा उठवितात. आणि मग ती पोळी काढून वर आणितात. नंतर त्यांतील मध पिळून काढून चोथा राहील त्यापासून मेण तयार करितात. हे काम रात्रीचे करावे लागते, कारण या वेळी माशांना दिसत नसल्यामुळेंं त्यांचे