पान:महाबळेश्वर.djvu/164

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १२९ )


दुर्गम ठिकाण या माशा हुडकून काढितात. आणखी कड्यांतून अशी कांही ठिकाणे असतात की, तिकडे मनुष्याची नजरसुद्धा जाणेचा संभव नसतो, व मधाची पोळी माशांचा मागच काढीत गेले म्हणजे मात्र सांपडते. अशा जागच्या पुष्कळ पोळ्यांतील मध काढून आणतात. अशा अस्मान तुटलेल्या कड्यांवरून नुसते खाली वाकून पाहिले असतां डोके भ्रमल्यासारखे होतें, काळीज धडधड उडू लागतें, सर्व अंगास कांपरें सुटतें, आणि सारे शरीर घामाने डबडबून जाऊन डोळे मिटून गप्प बसावेसे वाटतें; व कड्याखाली मध काढण्यास उतरल्यावर जर निसटून पडलो, तर हजारों फूट खोलीच्या दरीच्या तळाशी जाऊन पडूं व त्या ठिकाणी चूर्ण होऊन पडलेल्या माझ्या अस्थि गोळा करण्यास माझे आप्त किंवा मित्र काही केलें तरी येऊं शकणार नाहीत, असा विचार मनांत आल्यावांचून राहत नाही ! अशी भयंकर व दुर्घट ठिकाणे जरी या माशांनी पाहिली तरी त्यांनां शत्रू आहेतच. या जगांतील क्रमच असा आहे की परमे