हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १२३ )
असतो; तथापि याचा शीतोपचारादाखल उपयोग होत असल्यामुळे यावर फार उडया पडतात.
या ठिकाणी तांबडे बटाटे व हिमालयावर असणाऱ्या जातीचे बटाटे पुष्कळ पिकतात, त्यांची लावणी नोवेंबर महिन्यांत केल्यावर ते चार महिन्यांनी तयार होतात. येथील चांगल्या बटाट्यांपैकी चांगला पोसलेला एक बटाटा एक शेर वजन भरतो. पुणे मुंबईस या महाबळेश्वरी बटाट्यांची फार चहा आहे. येथे पराकाष्टेचा पाऊस असल्यामुळे यूरोपांतील जरी काही फळझाडे झाली तरी सर्वच फळझाडे होतात असे ह्मणतां येत नाहीत.
येथून पांच मैलावर अवकळी गांवीं शेट सोराबजी दादाभाई यांचा फार उत्तम बाग आहे. त्यांत हजारों रुपये खर्चुन चहाकाफीची लागण चालविली आहे.
मध.
वस्तू कितीही कष्टसाध्य असली तरी लोकांना तिची जरूरी असल्यास ती बाजारांत विकावयास आल्यावांचून रहात नाही. हे पुढील हकीगतीवरून सहज कळून येईल:-