पान:महाबळेश्वर.djvu/129

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
९४

( ९४ ) कोंकणे लोक सुधेपणानें बरोबर मन मोकळे करून माहिती सांगेनात. पुष्कळांस असें ठाऊकच असेल कीं कोंकण्यालोकांस झाडपाल्याचें कांहीं औषध माहित असलें आणि तें त्यांजपाशीं मागितलें असतां ते दुसऱ्यास कळू न देतां स्वतःच तयार करून देतात. असा यांचा स्वभाव फार खोल असतो. त्यामुळे म्हाताऱ्याकोताऱ्या अनुभवशीर कोंकण्या लोकांस फूल नाहीं फुलाची पाकळी देऊन किंवा त्यांची पुष्कळ खुशामत करून आम्ही वनस्पतींची माहिती मिळविली आहे. त्यांची नांवनिशी पुढें दिल्याप्रमाणें:-

महाबळेश्वर पांच मैलाच्या वर्तुळभागांत मिळणाच्या ओषधी वनस्पतींचीं नांवें.
नंबर प्राकृत किंवा कोंकणी नावे. संस्कृत नांवे.
आवळे. प्राचीबल.
आनव
आटिंगी
आडळीचें झाड.
आंबोळकी