Jump to content

पान:महाबळेश्वर.djvu/128

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ९३ )



त्यांच्या मरणानंतर त्यांच्या बरोबर परलोकास जाते, अशीं उदाहरणें इकडील कोंकणे लोकांत पुष्कळ सांपडतात. यामुळे वनस्पतींच्या कोणत्याही भागांत, परंतु बहुधा पंचांगांत (साल, मूळ, पान, फलाची पेशी व बीं, या भागांत ) जीं उपयुक्त औषधिद्रव्यें आहेत तीं दिवसेंदिवस कमी कमी उपलब्ध होत चाललीं आहेत. फार तर काय पण वनस्पतींच्या झाडपाल्याची ओळखसुद्धां नाहींशी होत चालली आहे असें होऊं देऊं नये, ह्मणून ही माहितीं जमवून प्रसिद्ध करावी असें आह्मांस वाटलें आणि आह्मी हें लोकसेवेचें काम हातीं घेतलें.

 या कोंकणे लोकांबरोबर शेतकीसंबंधानें निकटसंबंध झाल्यामुळे त्यांचे आजार व त्या आजारांचें फुकटच्या औषधानें झालेलें निरसन पाहून आमचे मनांत आलें कीं आपण त्यांच्यापासून, वनस्पतींची ओळख करून घेण्याची खूण, त्या वनस्पतींचे धर्म आणि त्यांचीं औषधिक्रिया समजून घ्यावी आणि ती यथामति लोकांत उघडकीस आणावी. परंतु या गेष्टीचा जेव्हां आह्मी पिच्छाच धरला; तेंव्हां हें