पान:महाबळेश्वर.djvu/124

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ८९ )



वनस्पति.

 औषधी पदार्थ तीन प्रकारच्या कोटींंत सांपडतात खनिज, उद्विज्ज व प्राणिज. त्यांपैकीं प्राचीनकाळापासून खनिज द्रव्यांच्या उपयोगापेक्षां वनस्पतींचाच उपयोग पृथ्वीच्या अनेक द्वीपांतील वैद्य ज्यास्त करीत आले आहेत असें दिसतें. कारण, खनिज द्रव्यांपैकीं जे धातू व उपधातू आजपावेतों प्रसिद्धीस आले आहेत, त्यांतील वीर्य अनेक योगांनीं व प्रकारांनीं रोग हा जो कोणीएक अदृश्य शत्रु आहे त्याच्या उपशमाकरितां योजितां येतें, व त्यांजपासून वनस्पतींच्या रसांसारखे असंख्य कल्प अथवा रससंयोग उत्पन्न करितां येतात असा थोडा अनुभव आहे. परंतु त्यांच्या नानाविध संयोगाची माहिती जशी पाहिजे तशी अजून लागली नसल्यामुळे आजपर्यंत त्यांचे प्रयोग रोग्यांवर कित्येक वैद्य निवळ साहसानें करीत आले व तसें केल्यानें त्यांजकडून अनेकवेळां प्रमाद घडल्याचेंही ऐकिवांत आहे. तशा प्रमादापासून कधीं कधीं बलनाश अथवा प्राणनाशही घडला असावा. वनस्पतींची तशी गोष्ट नाहों, औषधी रसांचीं कार्यें-