पान:महाबळेश्वर.djvu/123

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ८८ )हीं रोपें एकंदर पांच हजार आहेत. हीं झाडें सुरूच्या झाडांप्रमाणें उंच असून शोभिवंत दिसतात. हल्लींं हीं पांच फूट उंच झालीं आहेत. आणखी तीन फूट उंच होऊन मालकमपेठच्या मुसळ धारांचा पावसाळा त्यांस सहन होईशीं झाली ह्मणजे नर्सरींतून काढून फॉरेष्टांत यांची लागण करतात. हीं झाडें चांगलीं दिखाऊ आहेत. हल्लींं या झाडांची लागण फॉरेस्ट खात्याकडून बंदीचे जागेंत करण्याचें काम सुरू आहे.

 येथें कोणतेंही फळझाड पावसाळ्यांत मुळींच लागत नाहीं. विलायती फळझाडांपैकी राजबेरी, स्ट्राबेरी, व गुजबेरी हीं झाडें येथें लावितात पण तीं पावसाळा खलास झाल्यापासून पुन: पावसाळा लागेपर्यंतच लावलीं जातात. पावसाळाभर हीं झाडें कशीं तरी राखून बेण्याकरितां ठेवावीं लागतात. त्याचप्रमाणें हिंवाळ्यांत विलायती वाटाणा, फ्रेंचबीन हींंही येथें उत्पन्न करितात.