पान:महाबळेश्वर.djvu/121

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ८६ )केसाळ वनचराच्या अंगावरील लोंकरीप्रमाणें दिसत असतात. तसेंच घरच्या कंपौंडाकरितां घातलेले सुक्या दगडाचे गडगडे अगदीं बुरसून गेल्यामुळे चोहीकडे गारेगार झालेले दिसतात. ही शेवाळ गोगलगाईच्या अंगाप्रमाणें अगदीं गुलगुलित असते. साहेबलोक इचे फार भोक्ते आहेत. ते उशागिर्द्यांच्या खोळींतूनही ही भरून हिचा सुरेख उपयोग करतात. झाडावर शेवाळाच्या योगाने जीं लहान लहान फुलझाडें उगवतात तीं गोळा करण्याचा या लोकांस फार नाद आहे. या झाडांस हे लोक " ऑरकिड ” असें ह्मणतात. हीं कोयना खोऱ्यांंत पुष्कळच सांपडतात. तेथून आणून महाबळेश्वरचे कुणबी त्यांच्यावरही चार दोन आणे मिळवितात. अलीकडे तर हें बहुतेक बडे लोकांस आपले बागेत असावींंतसें वाटू लागलें आहे. हीं घेऊन जाणारे लोक बहुतेक मुंबईकडील राहणारे असतात. झाडांस किंवा पिकांस शेवाळाचा उपयोग खताप्रमाणें केला असतां फार चांगला होईल. साहेबलोक वगैरे हीं नेऊन पदार्थ संग्रहालयांतील भिंतीवर टांगून ठेवितात. तेव्हां याची फार शोभा दिसते.