पान:महाबळेश्वर.djvu/119

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ८४ )स्वस्त व विपुल मिळत असले कारणानें बाहेरून येणारे लोक येथून त्या नेहमीं हव्या तेवढया आपले बरोबर विकत घेऊन जातात. बाकीचे प्रकारचे कळक इमारतीचे उपयोगीं आहेत.

नेचे व आर्चिड

 येथील जंगलांत पांच मैलाचे त्रिज्येचे वर्तुळामध्यें सुमारें २३ प्रकारचे नेचे सांपडतात.

 या नेच्यांचीं झाडें रानांतून काढून आणून तीं साहेब लोक कमानीला वगैरे मोठ्या हैोसेनें लावून, एखाद्या समारंभाचे व थाटाचे वेळीं स्थळ सुशोभित करितात. याची फांदी हातांत घेऊन पाहिली तर त्याचे मधील दांडयाच्या दोही अंगांस लहान लहान पानांच्या बारीक काडीचे सरळ फांटे असून ते खालून शेंडयाकडे निमूळते होत जाऊन अगदीं शेवटीं त्यांस, आंकड्यासारखे वळण आलेलें असतें. अशा प्रकारचे नेचे मुंबईस मलबारहिलकडून हँगिंग गार्डनला जातांना लागणाऱ्या बागेजवळच्या रस्त्यावर बरेच दृष्टीस पडतात व ते मोठे शोभिवंत दिसतात. त्यांचें बेणें बहुतकरून महाबळेश्वराकडूनच गेलें असेल असें अनुमान