पान:महाबळेश्वर.djvu/118

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ८३ )

 गुरांखालीं घालतात. त्यांस इकडील गांवठी लोक " सोपल ” असें म्हणतात. त्यांचे योगानें गुरांस जमिनींतील ओलसरपणा न बाधतां चांगली ऊब येते. पावसाळ्यांत या झाडांस कोबीसारखा उंच दांडा येऊन शेवटास एक कणीस येतें, त्यास सर्व बाजूस पाकळ्या प्रमाणे टेंगळे दिसतात. त्यांतून फुलें बाहेर पडतात. तीं एकास सुमारें १ पासून १२ पर्यंत असतात. त्यांपैकीं कांहीं पिवळी व कांहीं पांढऱ्या रंगाची असून सुवासिक असतात. हें झाड फुलण्याच्या वेळीं सुमारें २ / फूट उंच होते. याचे कांद्यापासून अरारोट काढतात. त्याचा पुष्कळ खप आहे.

 इकडे डोंगराखालीं पांच मैलाचे हद्दीत कळकाचीं बेटें फार. या कळकांच्या चार जाती आहेत. त्या कळक, मेस, मानगा आणि चाकी; यांपैकीं ज्यांस मेस किंवा रानचिवे अगर उडे असें ह्मणतात, त्यांच्या कांठ्या कापून सुरेख तयार करून बाजारांत धावडलोक पुप्कळ विकावयास आणितात. या शिवाय या जंगलांतील गेळा, चिमुट, पांढरी, मेडशिंंगी, वगैरे झाडांच्याही कांठया येथें विकत मिळतात. यामुळे येथें कांठया