Jump to content

पान:महाबळेश्वर.djvu/105

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ७० )



असल्यास आणखी ज्यास्त खोल विहीर केल्यावांचून होत नाही. पुन्हां इतक्यांच खोलीवरून तिचें बांधकाम करून घ्यावें लागतें, यामुळे येथें विहिरी बांधण्यास बराच खर्च येतो. या साठी येथें सर्वच बंगल्यांना आणि घरांना विहिरी आहेत असें नाहीं.

 मालकमपेठेपासून एक मैलावर पुण्याकडून येणारे रस्त्याचे बाजूस, एक सरोवर आहे त्यास येथील लोक वेण्यातलाव असें ह्मणतात. यानें २८|२९ एकर जमीन व्यापिली आहे. याची खोली अदमासें १०| १२ फूट आहे. हा तलाव सातारचे राजाकडून बांधिला गेला आहे. वेण्या नदीचा उगम याचे वरच्या बाजूस आहे, परंतु या उगमाच्या पाण्याशिवाय पुष्कळ झऱ्यांचे पाणी यांत येऊन पडतें. या तलावाच्या नजिकच्या उंच डोंगराळ प्रदेशांतील कांहीं बागांतील विहीरीचें पाणी या सरोवराच्या योगानें वर आलें आहे. या सरोवरापासून निघणारा प्रवाह शेवटीं वेण्या नदीच्या पात्रांत जाऊन पडतो. ह्या डोंगराच्या उंच उंच भागांतून जे लहान लहान ओढे किंवा झरे निघतात, त्यांचे पाण्याचा उपयोग, त्यांच्या आसपासच्या जमी-