पान:महाबळेश्वर.djvu/104

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ६९ )

 राहावयाचें नाहीं. ज्याला महिना दीड महिना महाबळेश्वरीं काढून पांच चार शेर मांस वाढवून घेऊन परतावयाचे असेल त्यानें येथें हिंडणे, खाणें, व विश्रांति घेणें, या तीन धातुसाधित नामाच्या बाहेर फारसें जातां कामा नये. अकरा महिने कष्ट करून बारावा महिना खूप चैनीत घालविण्यास अत्यंत योग्य असें हें ठिकाण आहे.

---------------
पाणी
---------------

 येथील लोखंडी मातीचें पूट कोठेंही फार घट्ट नसल्यामुळे जमिनींत पाण्याचा तळ लौकर लागतो. क्षेत्र महाबळेश्वरांत ज्या विहीरी आहेत, त्यांस आठ किंवा दहा फुटांवर कृष्णाबाईच्या पाण्यासारखे गोड पाणी लागतें; यामुळे येथें विहीर काढण्यास खर्च कमी येतो ह्मणून अर्थातच येथें तर घरोघरीं विहिरी असणे अगदीं साहजिक आहे. परंतु मालकमपेठेस पाणी लागण्यास ४० पासून ६० फूट पावेतों विहीर खोदावी लागते, व पाण्याचा सांठा असणें जरूर - -