पान:महाबळेश्वर.djvu/106

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ७१ )



नीच्या शेतकामास फार होते. तो असा कीं, ठिकठिकाणीं त्यांचे पाट बांधून नेऊन शेतांतील पिकांस त्यांचें पाणी पाजतात. नंतर उपयोग विरहितचे त्यांचें पाणी मोठ्या प्रवाहास जाऊ देतात. त्यांचीं नांवें व ठिकाणें पुढें येतील.

 म्युनिसिपालिटीकडून व्यवस्था होत असलेले सार्वजनिक असे दोन तलाव आहेत; एक बिशप तलाव, मालकम टेंकडीच्या पायथ्याशी; व दुसरा एलफिन्स्टन तलाव किंवा तिकोनी विहीर, महाड रस्त्याचे बाजूस आहे ती. यांतील पाणी उन्हाळ्यांत फार माफक रीतीनें लोकांस दिलें जातें. कदाचित् कोणी जास्त पाणी नाशील ह्मणून बंदोबस्ताकरितां दोनही ठिकाणी म्युनिसिपालिटीकडील रखवालदार ठेविलेले असतात. बाहेरील लोकांस सुपरिंटेंडेंटसाहेब यांजकडे अर्ज करून येथील पाणी नेण्याची परवानगी मागावी लागते. याबद्दल त्यांचा असा ठराव आहे कीं, मालकांपैकीं थोर मनुष्यास अर्धी / पखाल मुलांस / आणि नोकर लोकांस / पखाल पाणी दररोज स्वयंपाकाकरितां व पिण्याकरितां द्यावें. या ठरावाच्या हिशेबानें रोज