पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/350

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 वारंगळ जिल्ह्यात जीव देणारे शेतकरी आयुष्यातील खडतर प्रश्नांना तोंड देण्यास असमर्थ ठरले; ते भेकडे होते का? त्यांनी शौर्य गाजवले, त्याच्या भोवतालच्या आर्थिक परिरिस्थतीचा आणि आईच्या मांडीवर शिकलेल्या नैतिक मूल्यांचा ते बळी होते.
 दहा-वीस वर्षांपूर्वी या भागात कापूस घेण्याचा कार्यक्रम चालू झाला, त्यावेळी जमिनी नव्या होत्या; एकरी पंधरा-वीस क्विंटल पीक येई. आता ते घटत घटत आठ-दहा क्विंटल इतके उतरले आहे. औषधाखतांचा खर्च एकरी बारापंधरा हजार रुपयांपर्यंत वाढला आहे. बऱ्यापैकी पीक आले तरी मजुरीखेरीज काही सुटण्याची शक्यता नाही. पाऊस ठीक पडला नाही, वादळ आले, बियाणे खराब निघाले, कीटकनाशकांत भेसळ असली किंवा नेमक्या पाणी देण्याच्या वेळी वीज गेली की मग तो बुडालाच. सर्कशीतील झोक्याइतकाच हा जीवघेणा खेळ. सर्कशीत खाली संरक्षण जाळे तरी पसरलेले असते; वारंगळच्या कपासशेतीत थोडी चूक झाली तर त्याला क्षमा नाही.
 मुडदे पडले म्हणजे गिधाडे जमतातच. ज्यांनी कधी शेतीच्या अर्थकारणात स्वारस्य दाखविले नाही असे स्वयंसेवी संघटनांचे नेते मुलताई आणि वारंगळभोवती घिरट्या घालत आहेत. शेतकऱ्यांना ते सांगतात, "तुमच्यावर हे संकट कोसळले ते सारे या खुलीकरणाच्या धारेणामुळे. हे असंल स्वातंत्र्य आपल्या काय कामाचं?" बहुराष्ट्रीय कंपन्या आणि जागतिक व्यापार संघटना यांच्यावरचा रागही ते या निमित्ताने काढून घेतात, 'बहुराष्ट्रीय कंपन्या आता हिंदुस्थानात ८०० रुपये क्विंटल भावाने कापूस पाठवीत आहेत. त्यामुळे कापसाचे भाव पडले आहेत. या शेतकऱ्यांच्या आत्महत्या नाहीत, हे बहुराष्ट्रीय कंपन्यांचे बळी आहेत' अशा प्रचाराना त्यांनी धूमधडाका चालविला आहे.

 यात आर्श्र्चय वाटण्यासारखे काही नाही. मनगढंत अफवा पसरविणे ही त्यांची कामाची शैली आहे. डंकेल प्रश्नावर चर्चा चालू होती तेव्हा हीच मंडळी देशभर साऱ्या शेतकऱ्यांना बागुलबुवा दाखवीत फिरत होती, हा डंकेल राक्षस तुमच्या शेतातील बियाणे आणि गोठ्यातील गोऱ्हासुद्धा घेऊ मागतोय' या असल्या बाष्कळ प्रचाराचा प्रतिवाद करावा लागतो हीच मोठी दुःखाची गोष्ट आहे. कीटकनाशकांचा संबंध आहे म्हणावे तर शेतकऱ्यांचा प्राण घेतला ते बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या औषधांनी नाही. तर देशी उद्योजकांच्या खोट्या उत्पादनांमुळे. परदेशात कापसाचे भाव हरहमेश येथल्यापेक्षा अधिक चढे राहतात. जागतिक व्यापार संघटनेकडेकडे व्यापार मंत्रालयाने जी आकडेवारी

बळिचे राज्य येणार आहे / ३५२