पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/32

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

VZ

भारत दशकातील चतुरंग शेती शेतकरी संघटनेचा शेगावचा जाहीरनामा घोषित झाल्यानंतर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह अनेकांच्या मनात प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे की इतके दिवस शेतकरी संघटनेने ज्या गोष्टींची चेष्टा केली, उपहास केला; ज्या गोष्टींतून शेतकऱ्यांचं भलं होणार नाही असं लोकांना ठासून सागितलं त्याच गोष्टी शेतकरी संघटना आता शेतकऱ्यांना उलटून सांगायला लागली आहे की काय?
 चतुरंग शेती म्हणजे शेतकऱ्याच्या स्वातंत्र्याचा सहज आविष्कार.
 पूर्वी जर कुणी येऊन सांगायला लागलं की शेतीला पाणी मिळायला पाहिजे; खतं किती वापरा, औषधं किती वापरा तर आम्ही त्याची चेष्टा करत होतो आणि म्हणत होतो की 'आबा पाटला' च्या सांगण्याप्रमाणे आम्ही खुरपण्या खूप वेळा केल्या आणि म्हशी गाई ठेवून बघितल्या, कारली लावली, तोंडली लावली; पण डोक्यावर कर्ज चढण्यापलीकडे काही झालं नाही. लोकांना आग्रहाने आम्ही सांगत होतो की शेती करण्याची कोणतीही पद्धत किफायतशीर नाही; कारण 'शेतकऱ्याचं मरण हे सरकारचं धोरण आहे' आणि आज आपण शेती कशी करावी, कोणती खतं वापरावीत असलं काही उलट बोलायला लागलो का काय?

 आम्ही असं म्हणत होतो की साखर कारखाना निघाला, सूतगिरणी निघाली, कृषिउत्पन बाजार समिती निघाली, व्यापाराची व्यवस्था झाली, बँकेची व्यवस्था झाली, पतपुरवठ्याची व्यवस्था झाली, कारखान्याची व्यवस्था झाली तरी परिणाम एकच झाला; शेतकऱ्याच्या अंगावर जेवढी काही सालटी होती तेवढीसुद्धा निघून गेली आणि आज आम्ही शेतकऱ्यांना व्यापार करा किंवा प्रक्रिया करा असं नेमकं उलट सांगायला लागलो आहो की काय ?

बळिचे राज्य येणार आहे / ३४