पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/313

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


दूध : सहकार विरुद्ध शेतकरी



 पल्या मालाला गिऱ्हाईक मिळू नये म्हणू कोणी उत्पादक करील काय ? उघड उघड अशक्य वाटणारी ही गोष्ट प्रत्यक्षात होत आहे.
 सहकाराचा खाजगीकरणास विरोध
 काही दिवसांपूर्वी कऱ्हाड येथे पश्चिम महाराष्ट्रातील दूध सहकारी सोसायट्यांच्या पुढाऱ्यांची बैठक झाली. त्यांनी महत्त्वाचा ठराव केला तो हा की सरकारने कोणत्याही परिस्थितीत खाजगी व्यवसायाला दुधाच्या क्षेत्रात उतरू देऊ नये. भले दुधाची मागणी कमी राहिली तरी चालेल; पण दुधाचा सगळा कारभार सहकारी संस्थांच्या हातीच राहिला पाहिजे.
 दिल्ली येथे भरलेल्या अखिल भारतीय सहकारी दूध संस्थांच्या संघटनेच्या एका बैठकीने यापुढे जाऊन, खाजगी कंपन्यांना दुधाच्या क्षेत्रात प्रवेश दिल्यास मोठे आंदोलन उभे करण्याची घोषणा केली आहे.
 सहकाराचा शेतकरीविरोध
 दुधाला भाव मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी जेव्हा जेव्हा आंदोलन केले तेव्हा तेव्हा ते आंदोलन या सहकारी संस्थांनी हाणून पाडायचा प्रयत्न केला. गिऱ्हाईकांचे, विशेषत : लहान बाळाचे, गर्भवती स्त्रियांचे दूध तुटता कामा नये असा कांगावा शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या वेळी करणारी ही मंडळी दुधाच्या क्षेत्रात खाजगी व्यवसायाचे पदार्पण होऊन शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळतील असे दिसताच बालकांचे आणि त्यांच्या आयाचे दूध तोडायला तयार झाली आहेत.
 हे सगळे काय गौडबंगाल आहे?
 केंद्र शासनातील चमत्कार

 दुधासंबंधी केंद्र शासनाने 'जीवनावश्यक वस्तू कायद्या' खाली एक नवीन

बळिचे राज्य येणार आहे / ३१५