पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/५६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अनन्यसाधारणपणाचा गाभा आहे. त्याचे उद्दिष्ट, स्वार्थ त्याला साधायचा आहे. कोणाला स्वार्थ पैशात दिसेल, कोणाला विद्येत, कोणाला शुद्ध आळशीपणे पडून राहण्यात. या व्यापक अर्थाने प्रत्येक व्यक्ती आपापला स्वार्थ साधण्याकरिता धडपडते. लक्षावधी- कोट्यवधी स्वार्थी व्यक्तींच्या धडपडीतून नकळत परमार्थ संपादिला जातो. शरीरातील एकेक पेशी तिच्या तिच्या स्वभावाप्रमाणे धडपडत असते. अशा धडपडीतूनच सबंध शरीराची एकात्मता बनते. स्वार्थ सत्य आहे, परमार्थ विपाक आहे.
 व्यक्तीचा मंचप्रवेश
 ४: एक व्यक्ती आणि विश्व यांचे हे एकात्मकतेचे निसर्गसिद्ध नाते आहे. हे अध्यात्मात जितके खरे तितकेच अर्थव्यवस्थेत किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात. माणसाच्या अंतिम कल्याणाचा मार्ग दाखवणारे साधू, संत, अवतार, प्रेषित, बाबा, महाराज असत नाहीत. तसेच कोथिंबीर किती पिकवावी आणि आगगाडीची इंजिने किती बनवावीत याचा हिशेब मांडणारा कोणी 'नियोजन महात्मा'ही असत नाही. आर्थर क्लोसर यांचे शब्द वापरायचे तर या जगात 'कमीसारां'नाही स्थान नाही आणि योग्यांनाही नाही. योगी, कमीसार, बाकी सारे मध्यस्थ, अडते व्यक्ती आणि विश्व यांची एकात्मता बिघडवण्याचेच काम करतात आणि आपल्या सिद्धांतांच्या अतिरेकी हट्टापायी रक्ताचे पाट वाहवतात. अनन्यसाधारण व्यक्ती मंचावर येत आहे, 'मध्यस्थ महात्म्यां'ची उचलबांगडी होत आहे.
 समाजव्यवस्थेचे फोल प्रयत्न

 ५ : व्यक्ती कितीही अनन्यसाधारण असली, तरी तिला समाजात राहावे लागते, साधने संपादन करावी लागतात, वस्तूंची आणि सेवांची देवघेव करावी लागते, देखरेखीसाठी विविध प्रकारची सत्तास्थाने आवश्यक असतात. सोईस्कर वाटतात; पण, सत्ता आली, की भ्रष्टाचार आला. कारण, सत्ता निगर्सविपरीत आहे. सत्तेशिवाय चालत नाही आणि सत्तेने सगळे काही बिघडते, हा मनुष्यजातीला पुरातन कालापासून पडलेला पेच आहे. सत्ता-भ्रष्टाचार, सत्तास्पर्धा हे सगळे टाळण्याकरिता इतिहासात अनेक प्रयोग झाले. माणसाची कामे जन्माच्या आधारानेच ठरावीत आणि त्यात प्रत्येकाने संतोष मानावा अशी व्यवस्था उभारण्याचा प्रयत्न झाला. समाजाला स्वतःच्या सामर्थ्याप्रमाणे देणारा आणि केवळ आपल्या गरजेपुरतेच घेणारा उदात्त समाजवादी माणूस तयार करण्याचेही प्रयत्न झाले. हातातील सत्ता, संपत्ती विश्वस्ताच्या निरिच्छेने हाताळली जावी अशा गांधीवादी नैतिक माणसाची कल्पना पुढे मांडण्यात आली; पण हे सगळे प्रयत्न फसले.

पोशिंद्यांची लोकशाही / ५८