पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/३३४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणुकीत देशप्रेमी मतदारांनी
 १. कोणत्याही परिस्थितीत मतदान केले पाहिजे.
 २. आपल्या मतदानाच्या हक्कावर कोणत्याही प्रलोभनाची किंवा धाकदपटशाची सावली पडू देऊ नये.
 ३. उमेदवार निर्मळ चारित्र्याचा असावा; निदान तो गुंड, दरोडेखोर, भ्रष्टाचारी नाही याची खात्री करून घ्यावी.
 ४. भारतीय शेतीची आजची गंभीर अवस्था समजण्याइतका अनुभव आणि बौद्धिक क्षमता उमेदवाराकडे आहे अथवा नाही, याची खात्री करून घ्यावी.
 ५. नागरिकांच्या जीविताचे आणि मालमत्तेचे संरक्षण करून पुन्हा एकदा 'कायदा सुव्यवस्था स्थापनाय' पराकाष्ठा करण्याची त्याच्यात क्षमता आहे किंवा नाही हेही अजमावावे.
 ६. जागतिक मंदी आणि देशातील आर्थिक स्थिती याबद्दल उमेदवाराकडे किंवा निदान त्याच्या पक्षनेत्यांकडे पुरेशी जाण आणि उपाययोजना आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यावी.
 इशारा
 पहिल्या भारतीय गणतंत्राला ६० वर्षे होत आहेत. एका नव्या गणतंत्राची उभारणी करून, भारताला विश्वविजयाचा मार्ग खुला करून देण्याची जबाबदारी देशातील मतदारांवर आहे. ही संधी गमावल्यास पहिले गणतंत्र बुडेल, अर्थव्यवस्था कोलमडेल आणि देशाचे मोठे प्रदेश पाकिस्तान आणि चीन गिळंकृत करतील अशी साधार भीती आहे.

(२१ जानेवारी २००९)

◆◆



पोशिंद्यांची लोकशाही / ३३६