पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/३१३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

झालेली काही तरुण मंडळी हाती शस्त्रे घेऊन, सर्रास खंडणीवसुलीचा व्यवसाय करतात आणि त्यालाच 'नक्षलवादी' असे नाव देऊन काहीसा उदात्त मुखवटा चढवण्याचा प्रयत्न करतात.
 केवळ नामसाधर्म्यामुळे नक्षलवादी चळवळीचे श्रेय आणि कलंक - दोन्हीही कम्युनिस्ट पक्षाला मिळाले आहेत. चळवळीचा फायदा सोडण्याइतके कम्युनिस्ट पक्षाचे नेते काही दुधखुळे नाहीत. संपुआ सरकारातील आपले वजनदार स्थान वापरून ते, संपुआ शासन नक्षलवाद्यांना संपूर्ण निपटून काढण्याइतकी कठोर कारवाई करणार नाही, याची काळजी घेतात. या नक्षलवाद्यांना होणारा शस्त्रास्त्रांचा पुरवठा प्रामुख्याने नेपाळातील माओवाद्यांमार्फत, पार दक्षिणेत आंध्र प्रदेशापर्यंत होत जातो. देशातील १४० जिल्ह्यांत नक्षलवाद्यांनी आज 'हवे तेथे आणि हवे तेव्हा' गनिमी काव्याचे हल्ले करण्याची शक्ती जमवली आहे.
 नक्षलवाद्यांच्या बाबतीत संपुआ शासनाची स्थिती 'अवघड जागी दुखणे आणि वैद्य जावई' अशी झाली आहे. नक्षलवाद्यांविरुद्ध परिणामकारक उपाययोजना होत नाही, त्यांच्याबरोबर संपुआची राज्यशासने वाटाघाटींची गुऱ्हाळे घालतात, नक्षलवादी आगगाड्या पाडतात, पोलीसतळांवर हल्ले करून पन्नासपंचावन्न पोलिसांना ठार करतात तरीही केंद्रीय गृहमंत्री मख्खपणे, 'नक्षलवादी काही निव्वळ आतंकवादी नाहीत; त्यांचे काही तत्त्वज्ञान आणि आर्थिक विचार आहे; ते लोकांच्या आर्थिक समस्या घेऊन उठतात त्यामुळे त्यांच्याशी सामोपचाराने वागले पाहिजे', अशी मखलाशी करतात.
 मुसलमान समाजाचा फायदा करून देण्यासाठी दलित, आदिवासी व इतर मागासवर्गीय यांच्याप्रमाणे त्यांनाही आरक्षण मिळावे असे प्रयत्न केंद्रातील आणि इतर राज्यांतील संपुआ शासने सातत्याने करत असतात. आतंकवादी विस्फोटातील प्रत्येक आतंकवादी आजपर्यंत मुसलमान समाजातीलच निघाला आहे. मुसलमान वस्तीत जागोजागी हत्यारे लपवली जातात आणि अनेक मदरशांमध्ये 'आतंकवादी मंत्र आणि तंत्र' यांचे पद्धतशीर प्रशिक्षण दिले जाते हे सर्वविदित असतानाही संपुआचे प्रवक्ते, 'प्रत्येक आतंकवादी मुसलमान असला तरी प्रत्येक मुसलमान आतंकवादी नाही', असा युक्तिवाद करतात. प्रत्येक आतंकवादग्रस्त देशात आतंकवाद निपटण्यासाठी विशेष कायदे करण्यात आले आहेत. पण, त्या कायद्यांचा उपयोग करून काही मुसलमानांना त्रास देण्यात आला अशा युक्तिवादाने रालोआने अमलात आणलेला 'पोटा' कायदा संपुआने रद्द केला.
 आसामात बांगलादेशीयांनी प्रचंड प्रमाणात घुसखोरी करून, तेथील राजकारणावर

पोशिंद्यांची लोकशाही / ३१५