पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२७१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

लागली, त्यासारखीच उपाययोजना केंद्रीय गृहखात्याला, कॅप्टन नंजाप्पा यांना तेथे पाठवून, करावी लागली.
 दुसऱ्या एका देशाशी निष्ठा बाळगणाऱ्या आणि उघडउघड सशस्त्र उठावाचा पुरस्कार करणाऱ्या पक्षाला भारतीय घटनेतील तरतुदींचा आधार घेऊन, भारताची राज्यव्यवस्था आतून उधळण्याची संधी देणे कितपत योग्य ठरेल?
 नंबुद्रिपादांचे साम्यवादी राज्य फार काळ टिकले नाही. इंदिरा गांधी काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्यानंतर त्यांनी आग्रह धरून, काही एक निमित्त काढून, केरळातील साम्यवादी सरकार बरखास्त करून, तेथे राष्ट्रपती राजवट लादली.
 त्यानंतर, केरळ आणि बंगाल या दोन राज्यांत कम्युनिस्ट सातत्याने विधानसभेच्या आणि लोकसभेच्या सज्जड जागा जिंकत गेले. बंगालमध्ये कम्युनिस्टांचे सरकार पंचविसावर वर्षे अबाधित चालले आहे. केरळात मात्र आघाडीच्या सरकारात मिळणाऱ्या सहभागावरच त्यांना संतुष्ट राहावे लागले आहे. त्यानंतरच्या काळात बंगालमध्ये नक्सलवाद्यांचे तुफान उसळले. सोईस्कर भूप्रदेश असलेल्या मध्य प्रदेश, महाराष्ट्र भागातही 'पीपल्स वॉर ग्रुप'च्या (पी.डब्ल्यू.जी.) च्या झेंड्याखाली त्यांनी पाय रोवले. या काळात त्यातील एका गटाने 'चेअरमन माओ, अमार चेअरमन' अशी घोषणा दिली. साध्यसाधनांच्या प्रश्नावर वादंग माजून, एकसंध कम्युनिस्ट पक्ष फुटला; त्याची निदान तीन मोठी शकले झाली. त्कंतील प्रमुख भारतीय कम्युनिस्ट पक्ष नेते श्रीपाद अमृत डांगे यांच्याशी सलोखा करून, केरळावर राष्ट्रपती राजवट लादण्यात पुढाकार घेणाऱ्या इंदिरा गांधी यांनीच कम्युनिस्टांतील या गटाला भारतीय राजकारणात एक प्रतिष्ठा मिळवून दिली.
 २००४ च्या लोकसभा निवडणुकांपर्यंत, साम्यवाद्यांच्या राजकारणातील स्थानाबद्दल कधी प्रश्नचिन्ह उभे राहील, असे वाटले नव्हते. सोव्हिएट युनियनला अफगाणिस्थानातून नामुष्कीने काढता पाय घ्यावा लागला. त्याचा आर्थिक डोलारा कोसळून पडला. राजकीय साम्राज्याची शकले झाली. साऱ्या जगभर समाजवादी नियोजन व्यवस्थेचा खेळखंडोबा झाला. कम्युनिस्टांचे स्फूर्तिस्थान सोव्हिएट युनियन कोसळून पडले, त्याची शकले झाली. कम्युनिस्टांचे दुसरे स्फूर्तिस्थान असलेला चीन बाजारपेठेत उतरून, जगातील महासत्तांशी स्पर्धा करण्यासाठी आखाड्यात उतरला. समाजवाद्यांना काही राजकीय भवितव्य राहिले असे भारतीय उपखंडाबाहेरतरी कोठे दिसत नाही.
 पण, भारतीय उपखंडातमात्र साम्यवाद्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढायला

पोशिंद्यांची लोकशाही / २७३