पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२१६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

हे ढोंग आहे. कारण, देश वाचवायचा असेल, तर देशाला बुडवायचं काम नेहरूंपासून राजीव गांधींपर्यंत या घराण्यातील सर्वांनी केलं हे सर्वप्रथम मान्य करायला हवं.
 बाबासाहेब आंबेडकर आयुष्याच्या शेवटी देशाविषयी फार निराश झाले. तेव्हा त्यांनी ठरवलं की आता पूर्वीसारखी 'शेड्युल कास्ट फेडरेशन' अशी जातीय नावाची संघटना न काढता 'रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया' नावाची राजकीय संघटना स्थापन करावी आणि देशातील प्रजासत्ताकवादी सर्व जातिधर्मांच्या नागरिकांना संघटित करावे. आंबेडकरांचा तो प्रयत्न यशस्वी झाला नाही.

(२१ मे २००३)

◆◆








पोशिंद्यांची लोकशाही / २१८