पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२१४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

व्हायला हवा होता. माझा सगळ्या लोकांवर आरोप आहे, की आपण ढोंगी आहोत. छाती पुढे काढून, या प्रश्नाला उत्तर द्यायची आपली तयारी नव्हती, जे उत्तर समोर दिसते आहे, ते आपण टाळतो आहोत आणि त्यामुळे आपल्याला मार्ग दिसत नाही. लोकसभेची तेरावी निवडणूक होवो, चौदावी होवो, पंधरावी होवो, जोपर्यंत हिंदुस्थानातलं सर्व राजकारण आणि व्यवस्था ही शंभर वर्षे मागे टाकलेल्या बहुजन समाजाच्या गतीने चालत नाहीत तोपर्यंत राष्ट्रीय प्रश्न सुटत नाहीत. जोतीबा फुल्यांनी त्यावेळी मांडलेले भाकीत प्रत्यक्षात आलेलं आपण पाहतोच आहोत 'पेशवाई' अवतरल्याचं.
 हिंदुस्थानात गेल्या शेकडो वर्षांत वेगवेगळ्या क्रांत्या अपुऱ्या राहिल्या. आगरकरांची क्रांती अपुरी राहिली, फुल्यांची क्रांती अपुरी राहिली, डॉ. आंबेडकरांची क्रांती अपुरी राहिली आणि जुन्या पद्धतीप्रमाणेच केवळ सवर्ण-वर्चस्व साऱ्या देशात राहिलं. नव्या परिस्थितीमध्ये, जसा एखादा ज्वालामुखी आतून खदखदत असतो त्याप्रमाणे बहुजन समाजाची, कष्टकरी समाजाची खदखद अंतर्यामी चालू आहे. जमिनीमध्ये कुठे कच्चा भाग दिसला की तेथून ज्वालामुखीचा उद्रेक होतो तसंच निवडणुकीच्या वेळी राजकीय कच्चा भाग दिसताच बहुजनसमाज आणि दलित समाजाचा हा खदखदणारा ज्वालामुखी उफाळून वर येतो.
 खरं म्हणजे देशाला सगळ्यात विनाशकारी घराणं हे नेहरू-गांधी घराणं आहे. या घराण्यानं स्वातंत्र्यापासून देशाचं वाटोळं केलं. इंग्रज जायचे होते त्यावेळी पंतप्रधान कोणी बनावं याविषयी चर्चा चालू झाली. महात्माजींनी सुचवलं की आपण प्रदेश काँग्रेस कमिट्यांच्या अध्यक्षांची मतं घेऊ. मतं घेतली गेली. त्यात सरदार वल्लभभाईंच्या बाजूला मतं पडली सतरा, जवाहरलाल नेहरूंना शून्य. पण गांधीजींना जवाहरलाल नेहरूंच्या बाजूने कोणीतरी सांगितलं की, 'जर नेहरूंना पंतप्रधान केलं नाही तर ते काँग्रेस सोडून जातील, देशात दुफळी माजेल. तेव्हा, तुम्ही काहीही करा आणि सरदार पटेलांची समजूत काढा.' गांधींनी फक्त पटेलांकडे पाहिलं आणि तो थोर मनुष्य समजायचं ते समजला आणि म्हणाला की, 'बापूजी, तुमची इच्छा असेल तर माझं नाव मी मागे घेतो.'
 आणि नेहरू पंतप्रधान झाले. नेहरूच अशा रीतीने पंतप्रधान झाले असे नाही, या घराण्याचं वैशिष्टयचं असं आहे. आधी 'मला पंतप्रधान व्हायचंच नाही' असं म्हणत रहायचं आणि वेळ आली की पटकन त्या खुर्चीवर उडी

पोशिंद्यांची लोकशाही / २१६