पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना ԿԿ* १५ केदारभट्टप्रणीत वृतरत्नाकर छन्दःशास्त्रावरील महत्त्वाचा आणि टीकाकारांना सुपरिचित असा ग्रन्थ म्हटला म्हणजे केदारभट्टप्रणीत वृत्तरत्नाकर हा होय. या ग्रन्थाचा रचनाकाल ख्रिस्तशके १२०० पूर्वीचा असावा असें दिसतें.* याचे सहा अध्याय आहेत. १ ल्या अध्यायांत अक्षरगणयति अित्यादिकांविषयी विवेचन अनुष्टुभ छन्दांत आहे. २-या अध्यायांत जातिसदृश पद्यप्रकारांविषयी विवेचन आहे. ३ -या अध्यायांत ओकाक्षरी वृत्तापासून दण्डक धरून शेंसवाशेंच समवृत्तांचीं लक्षणें,झुत्पलाने झुद्धृत केलेल्या सूत्रांसारख्या सूत्रांनी साङ्गितलीं आहेत. ४ थ्या अध्यायांत अर्धसमवृत्तांचीं लक्षणसूत्रे दिलीं आहेत. ५ व्या अध्यायांत विषमवृतें साङ्गितलीं असून सहाव्या अध्यायांत प्रस्तारविषय विवेचिला आहे. प्राकृत पद्यप्रकारांकडे केदारभट्टाने पूर्ण दुर्लक्ष केलें आहे. हा पिङ्गलानुयायी आहे, पण हा पिङ्गलाच्या कनकप्रभा आणि वरसुन्दरी या वृत्तांना मञ्जुभाषिणी आाणि अिन्दुवदना म्हणतोः आाणि मञ्जुभाषिणी नि अिन्दुवदना या नांवांचीं निराळींच वृतें हेमचन्द्राने साङ्गितलीं असतांह, कनकप्रभावृत्ताला मञ्जुभाषिणी आणि वरसुन्दरी वृत्ताला अिन्दुवदना हींच नांवें रूढ झालीं आहेत असें काव्यटीकाग्रन्थांवरून दिसतें. पणव आणि पङ्खचामर यांचीं लक्षणें वृत्तरत्नाकरांत निराळींच म्हणजे * म्नैोज्ौचेति पणवनामकम्” (क ३॥२२) आणि * जभौ जरी वदन्ति पठ्ठचामरम्? (के ३॥६७) अशीं आढळतात! केदारभट्ट हा मेघवितान, अनवसिता, द्रुतपदा, लक्ष्मी, वीरललिता, समदविलासिनी, सुवृत्ता (विस्मिता) हीं वराहमिहिराने दिलेलीं वृतें देत नाही; तसेंच पिङ्गलाने दिलेल्या वृत्तांपैकी विलासिनी, (सुर) ललना, तत, कान्तोत्पीडा, वाहिनी, गौरी, कुटिला (हंसश्येनी), शैलशिखा, अतिशायिनी, विबुधप्रिया, नाराचक, विस्मिता आणि शशिवदना हीं वृतें देत नाही !! झुपेन्द्रवज्रा, प्रहर्षिणी वंशपत्रपतित या तीनच वृत्तांचीं केदारभट्टाने दिलेलीं सूत्रे झुत्पलाने दिलेल्या सूत्रांसारखीं आहेत. बहुतेक सूत्रे स्वतन्त्रपणें रचिलेलीं दिसतात. केदारभट्ट वियोगिनीवृत्त देत नाही. आपल्या कुमारसम्भवावरील टीकेंत ( ३६) ‘ विषमे ससजा गुरु:समे सभरा लोऽथ गुरुर्वियोगिनी ” असें सूत्र झुद्धृत करून एका सुप्रसिद्ध वृत्ताचा छन्दःशास्त्राच्या अितिहासांत प्रथम झुलेख " P. K. Gode's Date of Vrttaratnäkara, Annals B. O. R. I. XVII, PP. 398.
पान:छन्दोरचना.djvu/579
Appearance