पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ԿԿ\9 छन्दःशाख्ाचा अितिहास छिनाथाने केला आहे. हें आता सुपरिचित झालेलें नांव त्याला कोठून मळालें? क्षेमेन्द्रहि या वृत्ताला विसरतो. हेमचन्द्र प्रबोधिता आणि प्राकृत ड्गल सुन्दरी अशीं निरनिराळीं नांवें देतात. हें नांव ओखाद्या दक्षिणात्य छन्दःशास्त्रकाराने दिलेलें असावें. मन्दारमरन्दचम्पूचा कर्ता मात्र वियोगिनी ई नांव योजितो. वृतरत्नाकरावर भट्टरामेश्वरसूनु भट्टनारायण या महाराष्ट्रीय पण्डिताची टीका आहे. ही मूळ ग्रन्थाला पूरक आहे. भट्टनारायण हा आपल्या तिस-या अध्यायावरील टीकेंत एका वर्गातील केदारभट्टाने साङ्गितलेल्या वृत्तांचें विवेचन झालें की त्या वर्गातील नवीन वृत्तांचीं लक्षणें केदारभट्टाच्याच पद्धतीने साड्गतो. ही नवीन वृतें वृतरत्नाकर-परिशिष्टांतील म्हणून परिचित आहेत. यांपैकी बहुतेकांचा समावेश काव्यतीर्थ रामधनभट्टाचार्य यांनी सभ्पादिलेल्या छन्दोमङ्क्षरीच्या आवृत्तींत केलेला आहे. १६ प्राकृत पैङ्गल प्राकृत पैड्रल हा वृतरत्नाकरानन्तरचा एक महत्त्वाचा आणि सुपरिचित ग्रन्थ आहे. याचा छन्दःसूत्रकार पिङ्गल याच्याशीं कांही सम्बन्ध नाही. कोणताहि पद्यप्रकार असो ' पिङ्गल असें म्हणतो ” म्हणून तो साड्गण्याची पद्धतच पडली असावी. याचे दोन परिच्छेद असून प्रथम परिच्छेदांत जातिसदृश पद्यप्रकारांचें विवेचन असून दुस-या परिच्छेदांत वृत्तविवेचन आहे. हीर ही जाति नसून वृत्त आहे, पण याचा समावेश प्रथम परिच्छेदांतच केलेला आहे. हा ग्रन्थ स्वयम्भूच्छन्द आणि कविदर्पण याप्रमाणे सर्वस्वी प्राकृतांत आहे. कित्येक श्लोकांतून हम्मीर राजाचा झुछेख येतो. मेवाडच्या या रजपूत राजाच्या राजवटीचा आरम्भ खिस्तशके १३०२ मध्ये झाला असल्यामुळे प्राकृत पैङ्गलाचा काल १४ व्या शतकाच्या मागे नेतां येत नाही. या ग्रन्थांत कपूरमङ्ख्ररी नाटकांतील काही श्लोक आहेत. शालिनी वृत्ताला शुदाहरण कपूरमज्ञरींतील घेतलें आहे; पण 'चउरंसा? या दुर्मिळ वृत्ताला त्याच नाटकांतील ‘ दिसबहुतंसी ” हैं झुदाहरण घेतलेलें नाही. श्रुदाहरणें बहुशः सयमक आहेत आाणि तीं बहुशः ग्रन्थकाराने स्वतः रचून घातलेलीं नाहीत असें म्हणतात. या गोष्टी चिन्तनीय आहेत. प्राकृत पैङ्गलाची रचना
पान:छन्दोरचना.djvu/580
Appearance