पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ५५५ छन्दःशाख्ाचा अितिहास नागवर्मन् छन्दस्सु या नांवाने आङ्ग्ल-कानडी आवृत्ति काढलेली आहे. म्हैंसूरच्या काव्यकलानिधिग्रन्थमालेने हा ग्रन्थ छन्दोम्बुधिया नांवाने प्रकाशित केला आहे. नागवर्म हा स्वतन्त्रपर्णे यति साङ्गतो. रथोद्धर्तेत तो सहाव्या अक्षरानन्तर यति साङ्गतो पण स्वागता वृत्तांत तो तसा यति साङ्गत नाही. त्याने काही वृतें नवीन दिलीं आहेत. अङ्गरुचीत्यादि त्याने दिलेलीं काही वृतें छन्दीनुशासनांत हेमचन्द्र देतो. परन्तु हेमचन्द्र त्याचा नांवाने झुछेख कां करीत नाही कळत नाही. नागवर्म पिङ्गलोक्त गणपद्धतीचाच उपयोग करतो. १३ हेमचन्द्राचे छन्दोनुशासन छन्दोनुशासन या ग्रन्थांत हेमचन्द्राने वृत्तजातींचा मोठाच सङ्ग्रह करून ठेविला आहे. हा सूत्रपद्धतीचाच अवलम्ब करतो; जसें, *मत्नायिः कुसुमितलतावेछिता ड्चै:” यगण लागोपाठ तीनदा येतो म्हणून यकार तिस-या स्वराने युक्त आहे. कपासून ङ् हें पाचवें नि च हें सहावें अक्षर आहे, तेव्हा * ड्चै:।” ने या वृत्ताचे यतीने पहिला पांच अक्षरांचा नि दुसरा सहा अक्षरांचा असे तुकडे पडतात असा बोध होती. सूत्रपद्धतींत असा थोडा निराळेपणा आणि वृत्तजातिसङ्ग्रहाचा मोठेपणा याव्यतिरिक्त छन्दोनुशासनांत विशेप कांही नाही. हेमचन्द्र सामान्यतः स्वरचित उदाहरणें देतो. तो मोठा सङ्ग्राहक आहे. वृत्तांना त्याने दिलेल्या नांवांहून निराळीं नांवें असल्यास तीं तो नीन्दून ठेवितो. घचित् प्रसङ्गीं तीं नांवें कोणों दिलीं आहत त्यांचींहि नांवें तो देती. अशा रीतीने त्याने भरत, जयदेव, स्वयम्भू यांच्या नांवांचा उल्लेख केला आहे. दोहाजातीचें लक्षण साङ्गतांना तो विरहाङ्काप्रमाणे मत देतो. १४ कविदर्पण कविदर्पण हाहि ग्रन्थ प्रो. वेलणकर यांनीच सम्पादून प्रकाशित केला आहे. या ग्रन्थाचा कर्ता कोण हें समजत नाही. कविदर्पणकाराने प्राकृतांत विशेषतः अपभ्रंश जातींचें विवेचन केलें आहे. हा हेमचन्द्राचा झुलेख करतो त्या अर्थी तो हेमचन्द्राच्या मागून होऊन गेला असावा. त्याने चतुष्थ झुद्देशांत कांही वृत्तांचें विवेचन केलें आहे. स्वयम्भूप्रमाणे हा वृत्तांचीं नांवें आणि लक्षणें प्राकृतांत देती. * रसेहिं निदिठ्ठा यमनसभला गो सिहरिणी ” असें तो शिखरिणींचें लक्षण देतो. यावरून लक्षणसूत्र साङ्गतांना तो झुत्पलाचें अनुकरण करितो
पान:छन्दोरचना.djvu/578
Appearance